लग्नाच्या 38 वर्षानंतर असं होणारच, नीतू सिंग यांनी शेअर केला मजेशीर फोटो!

अभिनेता ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग कपूर सोशल मीडियावर कमालीच्या अॅक्टिव्ह आहेत. रोज नव-नवे फोटो शेअर करणाऱ्या नीतू सिंग यांची खूप फॅन फॉलोर्इंगही मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत. याचदरम्यान नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये फोटोपेक्षाही या फोटोला नीतू यांनी दिलेलं कॅप्शन खुप खास आहे.
या फोटोत ऋषी कपूर आणि नीतू सिंग लंच करताना दिसत आहेत. यावेळी नीतू यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण ऋषी कपूर आपल्या फोनमध्ये बिझी असलेले पाहायला मिळाले. या सेल्फीला नीतू यांनी चांगलेच मजेशीर कॅप्शन देत शेअर केले. ‘लग्नाच्या 38 वर्षांनंतर तुम्ही पतीसोबत लंच डेटवर जात असाल तर असेच काहीसे होणार. मी येथे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतेय आणि माझे पती फोनमध्ये बिझी आहेत,’ असं नीतू सिंग यांनी लिहिलं आहे.
View this post on Instagram
View this post on InstagramNature teaches us to appreciate 🌸🌼🌺 #flowers #beautiful#happycolors #❤️🤗
View this post on InstagramA stroll at Central Park with perfect weather for company #vitD#beautifulday🌞☀️
गेल्या अनेक महिन्यांपासून ऋषी कपूर न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते.