Mon. Mar 8th, 2021

‘द कपिल शर्मा’शो या कार्यक्रमात नेहा आणि रोहनप्रीतने केले खुलासे…

कपिल शर्माच्या मंचावर नेहा आणि रोहनप्रीतने त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा केला खुलासा…

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचं लग्न फार चर्चेत होत. नुकत्याच झालेल्या ‘द कपिल शर्मा’शो या कार्यक्रमात नेहा आणि रोहनप्रीतने हजेरी लावली होती. या दरम्यान त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या नेहा रोहनच्या लग्नापासून ते त्यांच्या हनिमूनपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेा या शोमध्ये केल्या गेली. मात्र त्यांच्या लव्हस्टोरीच्या सुरुवात कशी झाली आणि रोहनप्रीतने लग्नाला पहिल्यांदा का? नकार दिला ही गोष्ट फार लक्षवेधी ठरली. कपिल शर्माच्या मंचावर नेहा आणि रोहनप्रीतने त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा झाले.

या शोमध्ये नेहाने तिची आणि रोहनप्रीतच्या लव्हस्टोरीचा उलगडा केला. शिवाय रोहनप्रीत कुठे आणि कधी भेट झाली हे देखील शेअर केलं. नेहा आणि रोहनप्रीत यांची पहिली भेट ऑगस्ट महिन्यात चंदीगढमध्ये झाली होती असं नेहाने सांगितलं. नेहा -रोहनची पहिली भेट एका गाण्याच्या निमित्ताने झाली होती. हे गाणं नेहाने लिहिलं असून तिनेच संगीतसुद्धा दिलं होतं या गाण्याच्या ऑडिशनसाठी रोहनला बोलावण्यात आल होतं.

त्यानंतर एकमेकांशी जुजबी ओळख झाल्यानंतर या दोघांनी गाणं शूट केलं. गाण्याचं चित्रीकरण संपल्यानंतर नेहाने रोहनकडे त्याच्या स्नॅपचॅट आयडी मागितला. मात्र, रोहनने स्नॅपचॅट आयडी देण्याऐवजी तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला. सुरूवातीला नेहाशी काय बोलावं हे रोहन कळत नव्हतं मात्र नेहा रोहनचा लाजाळू स्वभाव कल्पना असल्यानं नेहानेच एकदिवस तिला लग्न करण्याची इच्छा आहे असं सांगितलं आणि त्याला प्रपोज केलं. मी केवळ २५ वर्षांचा आहे असंच रोहन वारंवार नेहाला सांगत होता. त्यानंतर रोहनने लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर बराच काळ रोहन आणि नेहाचं बोलन बंद होतं. नेहाने प्रपोज केल्यानंतरही रोहन या लग्नासाठी फारसा तयार नव्हता. मात्र, काही काळ गेल्यानंतर रोहनने स्वत:च त्याचं देखील नेहावर प्रेम असल्याचं कबूल केलं. त्यानंतर या दोघांनी कुटुंबीयांच्या संमतीने लग्न दिल्लीत केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *