नेहा कक्कर लवकरच लग्न बंधनात अडकणार
नेहा कक्करचा राइजिंग स्टार सिंगर रोहन प्रीत सिंगसह झाला नुकताच रोका…

गायिका नेहा कक्कर हीने आपल्या आवाजाने अनेकांच्या मनात भुरळ पाडली आहे आणि आता लवकरच नेहा लग्न बंधनात अडकणार आहे असे तीने तीच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून फोटो शेअर करून स्पष्ट केले आहे. राइजिंग स्टार सिंगर रोहन प्रीत सिंग यांच्या सोबत नुकताच तीचा रोका झाला असून त्यात तिच्या घरातील मोजकेच लोक या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावर टाकली आहे. या व्हिडिओमध्ये नेहाने छान लेहंगा परिधान केला आहे आणि दोघेही भांगड्यावर ठेका धरतांना दिसत आहे तसेच नेहाने तिच्या हळदीच्या कार्यक्रमचे फोटो देखील तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे या फोटोत तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. दोघेही या फोटोत आनंदी दिसत आहे.

नेहाने हे फोटो (#nehudavyah) ह्या हॅशटॅगने पोस्ट केले आहेत. नेहाच्या लग्न पत्रिकेनुसार तिचा विवाह येत्या 26 ऑक्टोबरला होणार असल्याचं प्रसार माध्यमातून स्पष्ट झाले आहे. नेहाचं तिच्या एक्स बॉयफ्रेंड हिमांशू कोहली सोबत जेव्हा ब्रेकअप झालं होत तेव्हा तिचं नाव एका रिअलिटी शो च्या माध्यमातून आदित्य नारायण याच्यासोबत जोडले गेले होतं पण शोच्या TRP साठी अस करण्यात आलं होतं नंतर हे स्पष्ट झालं.