प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग हनीमूनसाठी दुबईला
नेहाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिच्या नावासमोर ‘मिसेस सिंग’ जोडल…

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग हनीमूनसाठी दुबईला गेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या अंदाजातील फोटो त्यांच्या इन्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ‘नेहू दा व्याह’ या म्युझिक व्हिडीओच्या सेटवर नेहा आणि रोहनप्रीत एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा विचार केला. दिल्लीत २४ ऑक्टोबर रोजी नेहा आणि रोहनप्रीतचा विवाहसोहळा काही मोजके पाहुणे व कुटुंबीयाच्या उपस्थितीत पार पडला.
लग्नसमारंभ झाल्यानंतर नेहा तिचे लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ इन्टाग्रामवर पोस्ट केली त्यानंतर नेहानं आता तिच्या हनीमूनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. नेहा आणि रोहनप्रीत दुबईतील ‘अॅटलांटिस द पाल्म’ या आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. नेहा आणि रोहनप्रीतने बरेच रोमॅण्टिक फोटो काढले आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव आहे.
हॉटेलमध्ये नेहा व रोहनप्रीतसाठी केलेली खास सजावट केली गेली आहे त्याचबरोबर हॉटेलमधील शेफकडून या नवविवाहित दाम्पत्याला मिळालेली गोड भेट देण्यात आली आहे. रोहनप्रीतने सुद्धा नेहाला दिलेलं सरप्राइज दिलं आहे . नेहा-रोहनप्रीतसाठी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. दुबईतल्या लग्नानंतर नेहाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिच्या नावासमोर ‘मिसेस सिंग’ असं जोडल आहे.