नेस वाडिया यांना जपानमध्ये 2 वर्षांचा तुरुंगवास

नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी जपानमधील सपोरो कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे. त्यांना 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. यांना मार्च महिन्यात होक्काइडो आयर्लंडच्या विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्याजवळ 25 ग्रॅम ड्रग्ज सापडले होते. परंतु 5 वर्षांसाठी ही शिक्षा निलंबित ठेवण्यात आली आहे. जर या 5 वर्षात नेस याने गुन्हा केल्यास त्याला तुरुंगात टाकले जाणार आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड होता. नेस वाडिया आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचा सहमालक आहे.
नेमकं प्रकरण काय?
वाडिया ग्रुपचे वारसदार नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जपानमधील सपोरो कोर्टाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
त्याला उत्तर जपानमधील होक्काइदो विमानतळावर न्यू चितोसे विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.
त्यावेळी त्याच्याकडे २५ ग्राम कॅनाबीस रेझिन आढळले होते. हे खाजगी वापरासाठी असल्याचे त्याने सांगितले.
परंतु 5 वर्षांसाठी ही शिक्षा निलंबित ठेवण्यात आली असून 5 वर्षात नेस याने गुन्हा केल्यास त्याला तुरुंगात
सन २०२० मध्ये टोकियोतील ऑलिम्पिक आणि यावर्षी होणारे रग्बी वर्ल्डकप यामुळे ड्रग्जसाठीचा बंदोबस्त वाढवण्यात आला.
देशातील श्रीमंत कुटुंबांपैकी एक असणाऱ्या वाडिया समूहाचा तो वारसदार आहे.
बॉम्बे डाईंग, ब्रिटानिया, गो एअर विमान यांच्यासहित अन्य कंपन्याही त्यांच्या समुहात येतात.
वाडिया कुटुंबाची संपत्ती सातशे कोटी रुपयांपर्यंत आहे.