Wed. Oct 21st, 2020

आता ऑनलाईन पाहता येणार रेल्वेचा रिझर्वेशन चार्ट

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. आता प्रवाशांना रेल्वे आरक्षण यादी (Reservation Chart) online पाहता येणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

‘प्रवासी आता बिनदिक्कत रेल्वे प्रवास करू शकतात. रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतरही एका क्लिकवर रेल्वे गाडीतील उपलब्ध जागांची माहिती प्रवाशांना आता उपलब्ध होऊ शकते’, असं ट्विट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. रेल्वेचं हे नवे फिचर ‘IRCTC’ या मोबाइल अॅपवरही (Mobile app) उपलब्ध असेल.

कसा पाहता येईल Reservation Chart?

1. ‘IRCTC’ वर लॉग इन करा.

यात रेल्वे आरक्षण यादी/उपलब्ध जागा, असा नवा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक केल्यावर नवं वेबपेज उघडेल.

2. नव्या वेबपेजवर प्रवासाचा तपशील द्यावा लागेल.

यामध्ये प्रवासाची तारीख आणि रेल्वेत बसण्याचे स्थानक याची माहिती भरावी लागेल.

यानंतर तुम्हांला ‘गेट ट्रेन चार्ट’ असा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक करा.

3. आता तुम्हाला रिझर्व्हेशन चार्ट दिसेल.

4. श्रेणी तसंच डब्यानुसार रिकाम्या जागांची माहिती दिसेल.

5. लेटआउट पाहण्यासाठी डब्याच्या क्रमांकावर क्लिक करा.

फायदे-

या सुविधेमुळे एखाद्या गाडीची आरक्षण यादी तयार झाल्यानंतरही त्या गाडीतील रिकाम्या जागा, आरक्षित केलेल्या जागा आणि अंशतः आरक्षित जागांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *