तरुणांमध्ये सध्या ‘ही’ hairstyle होतेय फेमस!

तरुणांमध्ये वेगवेगळ्या हेअरस्ट्राईलची नवीन फॅशन येत असते. मात्र सध्या एक वेगळीच हेअरस्टाईल trending मध्ये आली हे. पांडुरंग विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज यांसह वारकरी संप्रदायाशी निगडीत कलाकृती तरुण आपल्या डोक्यावर कोरून घेऊ लागले आहेत.
सध्या सुरू असलेल्या वारीमध्ये तरुणवर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी होतोय. वारकरी संप्रदायाकडे आकर्षित होतोय.
केसांची वेगळी स्टाईल करत त्यात आपली आराध्य दैवतं कोरतात.
डोक्यावर केसांमध्ये श्री विठ्ठलाची प्रतिमा करून विठूमाऊलीप्रति असलेली आपली भक्ती तरुण व्यक्त करत आहेत. पंढरपूरमधील नाभिक तुकाराम चव्हाण सध्या याच कामात चांगलेच व्यस्त झाले आहेत आपल्याला या कामात समाधान मिळतं अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केलीय.