Mon. Sep 20th, 2021

‘दादा मी प्रेग्नंट आहे’च्या होर्डिंग्सचं रहस्य उलगडलं

नाटक-सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी निर्माते वेगवेगळे फंडे वापरतात. दादरमधील प्रभादेवी येथे लावलेलं एक होर्डिंग नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  ‘दादा मी प्रेग्नेंट आहे’ या नावाचं होर्डिंग चांगलच गाजले आहे.. हे होर्डिंग केवळ दादरमध्येच नाही तर पुण्यातील कर्वेरोड येथील डेक्कन टी पॉईंट येथेही पाहायला मिळाले.

आता या होर्डिंग लावण्याचं कारण स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया बापटनं सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी सगळ्यांना वाटलेलं उमेश-प्रियाला बाळ होणार. अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या.

परंतू नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स एक नवंकोरं नाटक “दादा,एक गुड न्यूज” असं येत आहे. नुकतेच या नाटकाचे पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आले आहे. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे.

होर्डिंग हे आता जुनं समीकरण झालं आहे. त्यातही आता खूप वैविध्य आले. तसंच काही होर्डिंग्स असे असतात. जे नागरिकांची उत्सुकताही वाढवतात.

 

 

Priya Bapat@bapat_priya

तर ही आहे गुड न्यूज! आमची पहिली निर्मिती. खूप मनापासून, प्रेमाने जपलेली आणि वाढवलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत, तसंच आमच्या या नव्या प्रवासाला सुध्दा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळू देत.

47 people are talking about this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *