अमेरिकेत आणखी एक नवीन संकट
अमेरिकेत आणखी एक नवीन संकट आले आहे

करोना महासाथीच्या आजारासोबत दोन हात करत असलेल्या अमेरिकेत आणखी एक नवीन संकट आले आहे. अमेरिकेत मेंदू कुरतडणारा घातक अमिबा नेगलेरिया फाउलरली वेगाने फैलावत आहे. या अमिबाचा प्रसार दक्षिणेतील राज्यांपासून झाला आहे. आता उत्तर अमेरिकेतही हा अमिबा आढळत आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनच्या (सीडीसी) एका अहवालात ही बाब नमूद केली आहे.
अमेरिकेतील मध्यवर्ती पश्चिमी राज्यांमध्येही नेगलेरिया फाउलरली अमिबाची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यामध्ये मिन्नेसोटा, कंसास आणि इंडियानामध्ये सहा प्रकरणे आढळली आहेत. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, मेंदू कुरतडणारा अमिबा हा माती, गरम पाण्यांचे झरे, नदी आदी ठिकाणी आढळतो.
सीडीसीने म्हटले की, नेगलेरिया फाउलरली अमिबा घातक आहे. याची लागण झालेल्या व्यक्तिंचे प्राण वाचवणे कठीण असते. जवळपास २ ते ४ टक्केजणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. यासारख्या जीवघेण्या अमिबाची बाधा जलतरणादरम्यान होण्याची शक्यता अधिक असते.