Mon. Jan 17th, 2022

नववर्षाच्या सुरुवातीस महागाईचा दणका, सिलेंडरची दरवाढ

नववर्षाच्या सुरुवातीलाच जनतेला महागाईचा दणका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची दरवाढ केली आहे.

त्यामुळे आता जनतेला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या वाढलेल्या दरांमुळे आता जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 19.50 रुपयांनी महागला आहे.

मुंबईकर ग्राहकांना आता घरगुती वापराच्या सिलेंडरसाठी 684 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. तर याच घरगुती गॅस सिलेंडरसाठी दिल्लीतील जनतेला 714 रुपये मोजावे लागणार आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीसोबतच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडर 33 रुपयांनी महागलं आहे. व्यावासायिक वापरासाचा गॅस सिलेंडर 19 तर घरगुती वापराचा सिलेंडर हा 14 किलोचा असतो.

सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 12 सिलेंडरवर अनुदान दिले जाते. अनुदानित रक्कम सरकारच्या वतीने कुटुंबाच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.

शहरनिहाय घरगुती गॅस सिलेंडरचे सुधारित दर

मुंबई – 684 रुपये 50 पैसे
चेन्नई – 734 रुपये
दिल्ली – 714 रुपये
कोलकाता – 747 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *