Sun. May 9th, 2021

न्यूझीलंडने सर्वात आधी २०२१ मध्ये प्रवेश केला….

जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. आता यातच जगभरात 2021च्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झालं आहे. कोरोनाच्या संकटमुळे संपूर्ण जगाला वाईट परिस्थितीमधून जावं लागलं आहे. मात्र 2020 वर्षाला मागे सोडत न्यूझीलंडने सर्वात आधी २०२१ मध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या आठ तास पुढे असणाऱ्या न्यूझीलंडने भारतीय वेळेनुसार गुरुवारी दुपारी साडेचार वाजता नवीन वर्षात प्रवेश केला. जगभरामध्ये नवीन वर्षाची अधिकृत सुरुवात सर्वात आधी सोमा, टोंगा, आणि किरिबाती या लहान आकाराच्या देशांमधून केली जाते. त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या मोठ्या आकाराच्या देशांमध्ये चीन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स, भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत होते. त्यापाठोपाठ बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन या युरोपातील देशांमध्ये नवीन वर्षीचा बाराचा टोला पडतो. सर्वात शेवटी युनायटेड किंग्डम, आईसलॅण्ड, आयर्लण्ड आणि पोर्गुलामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी न्यूझीलंडमध्ये रस्त्यावर नागरिक गर्दी करून नवीन वर्षाचं स्वागत करतात. शिवाय कोरोनाचा सर्वात कमी प्रभाव असणाऱ्या देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होतो. तसेच न्यूझीलंडमध्ये अनेक शहरात सर्वात उंच मनोऱ्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते आणि लेझर लाइट्सच्या माध्यमातूनही नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *