Tue. Oct 27th, 2020

NZvsIND, 2nd ODI : जडेजाची एकाकी झुंज, अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव, मालिका गमावली

अतीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर २२ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने मालिका जिंकली आहे. ३ वनडे सीरिजच्या मॅचमध्ये आता २-० अशी स्थिती झाली आहे. या पराभवासह टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली आहे.

न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी  २७४ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युतरात टीम इंडियाला १० विकेट गमावून  २५१ धावाच करत्या आल्या.

टीम इंडियाकडून सर्वाधिक ५५ धावा रविंद्र जडेजा याने केल्या. तर श्रेयस अय्यरने ५२ धावा केल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची अडखळत सुरुवात झाली. टीम इंडियाने आपले पहिले ३ विकेट ५७ धावांवर गमावले.

मयंक अग्रवालच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का लागला. यानंतर ठराविक अंतराने टीम इंडियाने विकेट गमावले.

रविंद्र जडेजा आणि नवदीप सैनी या दोघांनी ८ व्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली.

न्यूझीलंडकडून हॅमिश बेनेट, टीम साऊथी, केल जॅमिन्सन आणि कुलीन डी-ग्रॅंडहोम यांनी प्रत्येकी  २ विकेट घेतल्या.

याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडले.

न्यूझीलंडची दिलासादायक सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोल्स या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली.

न्यूझीलंडच्या ९३ धावा असताना हेन्री निकोल्सला ४१ धावांवर चहलने एलबीडबल्यू केले. यानंतर ठराविक अंतराने टीम इंडियाच्या बॉलर्सने किंवींना झटके द्यायला सुरुवात केली.

न्यूझीलंडच्या  ५ खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक ७९ रन्स केल्या. तर रॉस टेलरने नाबाद ७३ धावा केल्या.

टीम इंडियाकडून युझवेंद्र चहलने ३ विकेट घेतल्या. यासह शार्दूल ठाकूरने २ तर रविंद्र जडेजाने १ विकेट घेतला.

दरम्यान या वनडे सीरिजमधील शेवटची आणि तिसरी वनडे मॅच ११ फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *