Thu. Oct 21st, 2021

निर्जन स्थळी आढळले नवजात मुलं, धनंजय मुंडेंना माहिती मिळताच…

धनंजय मुंडेनी रेल्वे ट्रॅकजवळ सापडलेल्या मुलीची घेतली जबाबदारी…

भारतात अनेक ठिकाणी अनेकदा स्त्री – भ्रुण हत्येसारखे प्रकरण बघायला मिळतात. अनेकदा मुलींना मुलांना कचरा पेटीत किंवा निर्जन ठिकाणी सोडून देतात.

अशा अनेक गोष्टी वारंवार समोर आल्या आहेत. मात्र यातील काही गुन्हेगार आद्यापही समोर आले नाहीत. याकडे प्रशासन कधी लक्ष देणार मोठा सामाजिक प्रश्नच समाजासमोर आहे.

दरम्यान अशीच एक घटना बीड या जिल्ह्यात घडली आहे. रेल्वे ट्रॅकजवळ काटेरी झुडूपात मुलीला सोडून कोणातरी पळ काढली.

या घटनेची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कानावर आली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मुलीला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखलं केलं आहे.

इतकचं नव्हे तर धनंजय मुंडेनी या मुलीचं पालकत्वसुद्धा स्विकारलं आहे. यापुढे या मुलीचा शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे करणार आहे.

धनंजय मुंडे यांनी या मुलीची जबाबदारी स्विकारली असून मुलेचे नाव शिवकन्या ठेवलं आहे.

धनंजय मुंडेंच्या या कार्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. तसेच सर्व स्तरावरून त्यांचे कौतुकही होतानाचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *