Mon. Dec 6th, 2021

नवरा पसंत नाही! नववधूने केली नवऱ्याची हत्त्या…

नवरा पसंत नाही म्हणून एका नवविवाहितेनं नवऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. वृषाली असं या आरोपी नवरीचं नाव आहे. 29 डिसेंबर 2018 रोजी जगदीश साळुंकेसोबत तिचं लग्न झालं होतं. लग्ननंतर काही दिवसांतच तिने पती जगदीशची वायरने गळा दाबून हत्या केली.

कसा रचला कट ?

29 डिसेंबर 2018 रोजी जगदीश साळुंके याच्या सोबत वृषालीचं लग्न झालं.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील दुर्गामाता परिसरात ते दोघे राहात होते.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडू लागले.

दोघांमध्ये सतत भांडणं होत होती.

बुधवारी रात्री वृषाली हिने पती जगदीशला जेवणातून विष दिलं.

एवढंच नव्हे तर वायरने गळा दाबून त्याची हत्या केली.

यानंतर वृषालीने 6 मार्च रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीच्या उद्देशाने नवऱ्याची हत्या झाल्याची तक्रार दाखल केली.

मात्र शवविच्छेदनानंतर वृषाली हत्येचा खोटा कांगावा करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

पोलिसांनी वृषालीला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

आता पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *