Sat. Mar 6th, 2021

मथुरेतील कृष्णजन्मभूमी वादावरील सुनावणी आता जानेवारीत

वृत्तसंस्था, मथुरा: श्रीकृष्ण जन्मभूमी जमीन वादावर आज(गुरूवार) मथुरा जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, ही सुनावणी ७ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. जिल्हा न्यायाधीश उपस्थित नसल्याने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.


काय आहे प्रकरण?
-मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराच्या आवारातील शाही ईदगाह मशीद हटवण्याची याचिका कर्त्यांची मागणी
-श्रीकृष्ण मंदिराच्या संपूर्ण १३.३७ एकर जागेवर मंदिर प्रशासनाचा दावा
-हिंदू मंदिराचा काही भाग पाडून मशिद बांधण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा
-मुघल सम्राट औरंगजेबाने १७ व्या शतकात हिंदू मंदिराचा काही भाग पाडून त्याजागी मशीद बांधली होती. मशीद बेकायदेशीर जागेवर असून मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढून टाकण्याची याचिकाकर्त्यांची मागणी


२६ सप्टेंबरला काही भाविकांनी या प्रकरणी मथुरा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. २ ऑक्टोबरला न्यायालयाने याचिका फेटाळली होती. मात्र, नंतर याचिका दाखल करून घेतली होती. १० डिसेंबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली होती. श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट १८ नोव्हेंबरला न्यायालयापुढे हजर राहू शकले नाही, त्यामुळे याचिका पुढे ढकलण्यात आली होती.


बाबरी मशीद प्रकरणानंतर केंद्र सरकारने १९९१ ला कायदा पास केला होता. त्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ साली देशात धार्मिक स्थळांची जी स्थिती होती, तीच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. धार्मिक स्थळांच्या मालकी हक्कांवरून वाद होऊ नये हा हेतू यामागे होता. या प्रकरणी २ ऑक्टोबरला न्यायालयाने धार्मिक श्रद्धास्थाने कायदा १९९१ चा दाखला देत याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *