Sat. May 15th, 2021

कोरोनावरून निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

महाराष्ट्रात कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री दररोज जनतेशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आश्वासक बोलण्याचं, मोजकंच पण महत्त्वाचं निवेदन करण्याचं आणि भीतीच्या वातावरणात जनतेला दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत. ठाकरे यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र त्याचवेळी आमदार निलेश राणे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे बळी ५० % आहेत. तरीही आपण महाराष्ट्र सरकार चांगलं काम करत असल्याचं आपण म्हणायचं, अशा शब्दांत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. रविवारपर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ११३ वर गली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४८ वर पोहोचली आहे. देशभरातील कोरोनाच्या बळींची संख्या ८९ आहे. त्यातील ४६ जण महाराष्ट्रातले आहेत. देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर असूनही मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, असं म्हणणं म्हणजे खोटेपणा आहे, असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून सुचवलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *