Sat. Mar 28th, 2020

निर्भया प्रकरण : निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर

निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय राखून ठेवल्याने निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर पडली आहे.

या सर्व प्रकरणामुळे या गुन्हेगारांना फाशी केव्हा देण्यात येणार, असा संतप्त सवाल केला जात आहे.

निर्भया प्रकरणातील ४ दोषींना देण्यात आलेल्या फाशीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं.

दरम्यान निर्भयाच्या गुन्हेगारांना १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती.

याप्रकरणी दुसऱ्यांदा फाशीनामा जारी झाला होता.

यापूर्वी २७ जानेवारीला या नराधमांना फासावर चढवले जाणार होते. मात्र गुन्हेगारांनी दयेचा अर्ज, फेरविचार याचिका या सारख्या अनेक पर्यायांचा वापर करत आहेत.

यामुळे दोन वेळा फाशीची प्रक्रिया न्यायालयाला लांबणीवर टाकावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *