Sun. Jul 5th, 2020

राहुल गांधी चोर हा शब्द वापरतात पण जनतेने त्यांना जागा दाखवून दिली – निर्मला सीतारामण

राहूल गांधी हे जेव्हा चोर चोर हा शब्द वापरतात तेव्हा जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे हे लक्षात ठेवावं. अशी टीका त्यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.आर बी आय ने नेमलेल्या समीतीत अनेक एक्सपर्ट होते. त्या समितीने केलेल्या शिफारशी नुसारच 1 लाख 76 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला. तसेच राहूल गांधी हे जेव्हा चोर चोर हा शब्द वापरतात तेव्हा जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे हे लक्षात ठेवावं. अशी टीका त्यांनी केली आहे.

काय म्हणाल्या निर्मला सीतारामण ?

कॅगचा रिपोर्ट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. कॅगचा रिपोर्ट ३० जुलैला संसदेत मांडण्यात आला. त्यामधे जी एस टी च्या अंमलबजावणीत मोठे दोष आहे.जी एस टी नंतर सरकारचं उत्पन्न १० टक्क्यांनी घटल्याच या अहवालात म्हटलं आहे.

त्याचबरोबर टॅक्स भरणार्यांच प्रमाण घटल्याच म्हटलं आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मी आधीच घोषणा केल्यात. त्याचा काय परिणाम होतो हे पाहून पुढील निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे.

जातील किंवा निर्णय घेतले जातील एवढंच निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. पुण्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी कोणताही ठोस घोषणा नाही.

वाहन उद्योगासाठी काही घोषणा केल्या आहेत, त्याचा परिणाम काय होतो हे पाहून पुढे काय उपाय योजना करायच्या त्याचा विचार केला जाईल. राहुल गांधी यांनी या पूर्वी ही चोर चोर आरडा ओरडा करत होते, त्यांना जनतेने त्याला उत्तर दिले आहे, आता ही ते आरबीआयचे पैसे चोरल्याचा आरोप करत आहेत, त्याला मी महत्व देत नाही.

आर बी आय ने दिलेल्या पैशांचा नेमका कसा उपयोग होणार याचे नियोजन केले जाईल असं त्या म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *