नितेश राणेंना अटकपूर्व जामीन की अटक? उद्या होणार निर्णय

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर आज युक्तीवाद अपूर्ण राहिल्यामुळे उद्या पुन्हा युक्तिवाद होणार आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन सुनावणी मंगळवारी अपूर्ण राहिल्यामुळे आता ही सुनावणी बुधवारी होणार आहे. त्यामुळे आता याप्रकरणी राज्यात पुन्हा राणे आणि शिवसेना आमनेसामने येणार आहेत.
नितेश राणे यांचे वकील ऍड. संग्राम देसाई यांनी न्यायालयाकडे अंतरिम जामिनाची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने अंतरिम जामीनाची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग न्यायालयाने नितेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.