Sun. Sep 19th, 2021

माझ्या जन्म पत्रिकेवर माझ पद नाही तर जात लिहीलेय; मराठा समाजासाठी आर-पारची लाढाई लढण्याचा नितेश राणेंचा निर्धार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपुत्र तथा काँग्रेस आमदार नितेश राणे जय महाराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सर्वच पश्नांची

थेट अचूक आणि बेधडक उत्तरे दिले. 

 

नितेश राणेंच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे

 

– विरोधी पक्षाने आक्रमकच असले पाहिजे

– माझ्या जन्म पत्रिकेवर माझ पद नाही तर जात लिहीली आहे

– मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आर या पारची लढाई लढणारच

– ज्यांनी निवडणुक दिले त्यांनी काय दिवे लावले हे कोकणी जनतेच्या लक्षात आलेय

– इतर नेत्यांना वेगळा न्याय दिला जातो आणि राणेंना वेगळा न्याय दिला जातो; आमच्यावर हा अन्याय का?

– न्याय मिळवण्यासाठी जे शेतकऱ्यांनी केले ते आमच्या मराठा बांधवांनी का केले नाही?

– मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते मिळवण्याची धमक असली पाहिजे

– मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार

– राणे सर्वत्र फक्त वादच घालतात अशी आमची प्रतिमा तयार केली जात आहे

– नविन आमदारांना सभागृहात बोलू दिले जात नाही

– राणेंना इतर नेत्यांप्रमाणे न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा

– खिशातील पैसे टाकून आम्ही पक्षाला वाढवतोय; ही आमची चुक आहे का?

– मी पद मिळवण्यासाठी नाही तर जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे 

– सभागृहात आम्हाला बोलूच दिले जात नाही; सभा त्याग करायला भाग पाडले जाते

– निवडणुका जिंकणे, पक्ष चालवणे ही चूक आहे का?

– दिल्लीतील आमच्या नेत्यांना राणेंची किंमत माहीत आहे

– निरीक्षक पद हा संशोधनाचा भाग आहे; त्यावर संशोधन झाले पाहिजे

– पक्षाकडे पाहून नाही तर व्यक्तीकडे पाहून जनता मतदान करते

– स्थानिक मच्छीमारांना कुणीही न्याय देत नाही

– राजकीय पक्षाचा स्टँम्प असला तरी ठीक नाहीतर जनतेसाठी काम करतच राहणार 

– मुंबईकरांनी शिवसेनेकडून जास्त अपेक्षा ठेवणे योग्य नाही

– अधिकारी कोणालाही जुमानत नाहीत

– मी मासा फेकणाऱ्यातला नाही, मासा खाणारा आहे  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *