Sat. May 15th, 2021

महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा बंद

‘ऑल फूड अँड लायसन्स होल्डर फाऊंडेशन’चा BMC रुग्णालयांना औषध पुरवठा न करण्याचा निर्धार केला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून काही दिवसांपूर्वी औषध पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. मेडिको प्रा. लि. या औषध पुरवठादार कंपनीनं औषधांचा पुरवठा उशीरा केला. त्याबद्दल 15 लाख रुपये दंडही भरला. मात्र, तरीही पुरवठादारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. टेंडरचे सर्व नियम पाळूनही औषध पुरवठादारांना BMC कडून ब्लॅकलिस्ट केलं जातं असल्याचा आरोप ‘ऑल फूड अँड लायसन होल्डर फाऊंडेशन’ने केला आहे.

या संदर्भात फाऊंडेशनच्या प्रतिनीधींनी आयुक्तांसोबत बैठकही घेतली.

मात्र, औषध पुरवठादारांना आयुक्त काळ्या यादीत टाकण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.

त्यामुळे, 44 औषध पुरवठादार कंपन्या बीएमसी रुग्णालयांना औषधे पुरवणार नाहीत…

काय होणार परिणाम?

बीएमसी अंतर्गत येणारी 17 मोठी हॉस्पिटल्स

33 मॅटर्निटी होम्स

178 डिस्पेंसरींना

उद्यापासून औषधे मिळणार नाहीत.

कोणकोणत्या औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम?

मलेरिया- टॉक्सीटायलीन

डेंग्यु- सिप्क्झीन

पँरेसिटेमोल

रँमेटीडीन

हार्ट- इकोस्प्रीन

डायबेटीक- मेकफॉर्मिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *