फटक्यांच्या जोरावर विजयी ठरवणे अयोग्य – सचिन तेंडुलकर

12व्या World Cup स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगला. न्यूझीलंडने दिलेल्या 241 धावांचे आव्हानाचे पाठलाग करताना इंग्लंडनेही 240 धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला 6 चेंडूत 16 धावांचे आव्हान देण्यात आले होते. या सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंडला विजयी ठरवण्यात आले. मात्र माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने याबाबत सूचना दिली आहे. अतिकठीण परिस्थिती उद्भवल्यास सरस एकूण सीमापार फटक्यांच्या जोरावर विजयी ठरवण्याऐवजी अजून एक सुपर ओव्हर घेण्यात यावी असे म्हटलं आहे.
काय म्हणाला सचिन तेंडुलकर ?
World Cup स्पर्धेच्या अंतिम फेरीत रंगलेला सामना हा अतितटीचा होता.
अशा अतिकठीण सामना उद्भवल्यास सरस एकूण सीमापार फटक्यांच्या आधारे विजयी ठरवणे योग्य नाही.
तर आणखी एक सुपर ओव्हर घेण्यात यावी असे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी म्हटलं आहे.
फटक्यांच्या आधारे इंग्लंडला विजयी ठरवल्यामुळे नेटीझन्सने प्रचंड टीका केली आहे.
World Cup चा अंतिम सामना रंगतदार झाला असून हा सामना अटीतटीचा ठरला.