Mon. Jan 17th, 2022

‘हिंदी भाषा लादली जाऊ नये’, रजनीकांत यांची सूचना!

हिंदी दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ‘एक राष्ट्र एक भाषा’ या सूत्राचा त्यांनी आग्रह धरला होता. हिंदी भाषाही देशाच्या एकात्मतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे शहा यांनी कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. त्यावर दक्षिण भारतातील जनतेने अनेक नेत्यांनी तसंच अभिनेते कलम हासन यांनी विरोध दर्शवला. तामिळनाडूचे सुपस्टार रजनीकांत यांनीही हिंदी भाषेच्या आग्रहाला विरोध केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेते कमल हासन यांच्यानंतर दक्षिणतेतील सुपस्टार रजनीकांत यांनी अमित शहा यांना हिंदी भाषेच्या बाबतीत विरोध केला आहे. राजकारणात उतरलेले अभिनेते कमलहसन यांनी अमित शहा यांनी आव्हानं दिलं. ‘कोणताही शहा किंवा सुलतान ‘विविधतेत एकता’ या घटनेतील तत्वावर आव्हान देऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले होते.

त्यानंतर अमित शहा यांच्या वक्तव्यावर रजनीकांत यांनी ही विरोध केला आहे.

‘तामिळनाडू काय, दक्षिणेतील कोणत्याही राज्यावर हिंदी भाषा थोपवली जाऊ नये. तसं झाल्यास संपूर्ण दक्षिण भारत प्रचंड प्रमाणात विरोध करेल,’ असा इशारा रजनीकांत यांनी दिला.

‘एकच भाषा ही कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी चांगलीच असते. परंतु आपण भारतात हे धोरण राबवू शकत नाहीत.

भारताला कोणतीही एक भाषा कॉमन नाही. यामुळे तामिळनाडूवर हिंदी लादण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल.

फक्त तमिळनाडूच नव्हे तर, दक्षिणेतील कोणत्याही राज्याला हिंदी भाषा लादली जाऊ नये. असे रजनीकांत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *