Mon. Apr 19th, 2021

कोरोना रुग्णांचे कपडे, पांघरूणं धुवायला परिटांचा नकार

संदेश कान्हु, जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

यवतमाळ शासकीय रुग्णालयात 3 रुग्ण कोरोना विषांणूनी ग्रासलेले आहेत. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. अशातच स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांचे कपडे,बेड शीट्स या वेळोवेळी बदलल्या जातात. पण आता हे कपडे आणि बेड शीट्स कोणी धुवायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यवतमाळ शासकीय रुग्णालयातील परिटांनी हे कपडे धुण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

यवतमाळ मध्ये शासकीय यंत्रणा कोरोनाशी लढायला सज्ज झाली आहे. यवतमाळ मध्ये दुबईहून आलेल्या पर्यटकांपैकी तिघे कोरोना बाधित आहेत. या रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयाच्या एका वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं आहे. या तिघांवर उत्तम पद्धतीने उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा पण होत आहे.

स्वच्छतेच्या दृष्टीने यांना स्वच्छ कपडे, बेडशीट्स पुरवण्यात येतात. पण वापरलेले कपडे आणि बेडशीट्स कोणी धुवायच्या असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सफाई कामगारांनी हे कपडे शासकीय रुग्णालयाच्या लॉण्ड्रीमध्ये आणून टाकले. पण कोरोनाच्या भीतीने लॉण्ड्रीतील परिटांनी हे कपडे धुण्यास नकार दिला आहे. आता या कपड्यांचं काय करावं हा प्रश्न प्रशासनापुढे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *