Tue. Jan 28th, 2020

गोपीनाथ मुंडे असते तर कोणाची हिमंत नसती – प्रीतम मुंडे

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना परळीमध्ये विषारी राजकारण सुरू आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रचारसभेत पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राजकीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान हा वाद झाल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्याचबरोबर खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच गोपीनाथ मुंडे असते तर असं बोलण्याची कोणाला हिमंत झाली नसती असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

काय म्हणल्या प्रीतम मुंडे ?

पंकजा मुंडे यांनी बीडच्या विकासासाठी काम केलं ही त्यांची चूक आहे का ? असा सवाल उफस्थित केला.

एवढ्या खालच्या पातळीवरील वक्तव्य ऐकवत नसल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे नेहमी खंबीरपणे उभे राहतात. कधीही खचल्या नसल्याचे म्हणाल्या.

काही झालं तरी खचत नसल्याने हीच त्यांची पोटदुखी आहे.

गोपीनाथ मुंडे असते तर असं बोलण्याची कोणाला हिमंत नसती असेही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे खचल्या नाही तर उद्विग्र झाल्या आहेत. असं तिला मी कधीच पाहिले नसल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

स्वत:चा रक्ताचा भाऊ खालच्या पातळीवर जाऊन बोलले तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती होईल असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *