Sat. Oct 31st, 2020

अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या सर्वात मोठ्या बॉम्ब हल्ल्यात 36 अतिरेकी ठार 

वृत्तसंस्था, अफगाणिस्तान

 

मदर ऑफ ऑल बॉम्ब अशा नावाने कुप्रसिद्ध असलेल्या सर्वात मोठ्या नॉन न्युक्लेयर बॉम्बने अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळावर हल्ला केला. नानगरहार या भागातील गुहांमध्ये आयसिसचे दहशतवादी लपलेले आहेत. 

 

त्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आल्याचे अमेरिकेनी म्हटले आहे. अमेरिकेनी नानगरहार या भागात आचीन जिल्ह्यातील आयसिसच्या तळावर जीबीयू-43 हा बॉम्ब टाकला. हा भाग पाकिस्तान सीमेलगतच आहे. 

 

या शक्तिशाली बॉम्बहल्ल्यात आयसिसचे 36 अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात केरळमधील मुर्शिद हा युवकही ठार झाला आहे. केरळमधून बेपत्ता झालेल्या 21 तरुणांमध्ये मुर्शिदचाही समावेश होता.

 

तो आयसिसमधून लढण्यासाठी गेल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. अमेरिकेच्या विशेष हवाई पथकाने एमसी-130 या विमानातून जीपीएसच्या साह्याने हा बाँब टाकला. शक्तिशाली बाँब अमेरिकेने इराक युद्धावेळी 2003 मध्ये तयार केला होता आणि त्याची चाचणीही झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *