Wed. Sep 23rd, 2020

रखडपट्टीमुळे रिलायन्स इन्फ्राचा टोल नाका बंद होणार?

खेड शिवापूर येथील टोल नाका (Toll) बंद करण्याची शिफारस जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केली आहे. तब्बल नऊ वर्षे कामाची रखडपट्टी होऊनही अनेक कामं पूर्ण राहिली आहेत. पुणे-सातारा रस्त्यावरील अशा अपूर्ण आणि त्यामुळे वाहतुकीस धोकादायक झालेल्या रिलायन्स इन्फ्रा (Reliance Infra) कंपनीचा टोल नाका बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा याबाबत पत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापकांना दिले आहे.

याच कारणांवरून प्राधिकरणाच्या पुणे महाव्यवस्थापकांनी यापूर्वीही हा टोल नाका बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शिफारस वरीष्ठ कार्यालयाकडे केली होती.

मात्र, त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे वास्तवही जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रावरून स्पष्ट झालं आहे.

मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या पुणे-सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम रिलायन्सला ऑक्टोबर 2010 मध्ये देण्यात आले होते.

मूळच्या अडीच वर्षांच्या कामाला साडेसहा वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.

या कालावधीतही हे काम पूर्ण झाले नाही.

रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होतात.

उड्डाणपूल, सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. या सर्वामुळे वाहनधारक असतानाही टोलवसुली मात्र चोखपणे सुरू आहे.

रस्त्याच्या रखडलेल्या कामाबद्दल यापूर्वीही आंदोलने झाली.

नुकतीच नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे पुण्यात आले असताना जिल्हाधिकारी यांनी त्यांची भेट घेत याबाबत चर्चा केलीय.

यापूर्वीही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे भाष्य केलं होतं. त्यावर पुढे काहीही झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *