Fri. Apr 23rd, 2021

वाहनचालक, घरगडी यांनाही मिळणार पीएफचा लाभ

आता लवकरच तुमच्या घरी काम करण्यासाठी कामगारांना किंवा कमी वेतन असणाऱ्या कामगारांना पीएफचा लाभ घेता येणार असल्याची शक्यता आहे. मोदी सरकार सोशल सेक्यूरिटी नेटमध्ये विस्तार करण्यासाठी अनेक योजना काढत आहेत. सरकारने असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान श्रम योगी मानधान पेन्शन योजना सुरू केली आहे. याच योजनेत आता वाहनचालक किंवा घरी काम करणाऱ्या महिलांना पीएफ मिळणार असल्याचे म्हटलं जात आहे.
काय आहे खुशखबर ?
वाहनचालक, स्वयंरोजगार करणाऱ्यांना पीएफचा लाभ मिळणार असल्याचे म्हटलं जात आहे.
त्याचबरोबर यासाठी संबंधित कायद्यामध्ये आवश्यक बदल करणार आहे.
बदलांनंतर कोणत्याही प्रकारच्या आस्थापनात पीएफचा दर व अंशदान किती असावे हे निश्चित करण्याचा अधिकार सरकारला मिळेल.
किमान २० कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांच्या मालकांना पीएफ योजना राबवणे बंधनकारक आहे.
पीएफची एकूण रक्कम २४ टक्के असून यासाठी कर्मचारी व आस्थापन यांच्याकडून प्रत्येकी १२ टक्के अंशदान दिले जाते.
पीएफसाठी पात्र होण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचा मासिक पगार किमान १५ हजार रुपये असणे आवश्यक आहे.
कर्मचारी निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) गंगाजळी सध्या साडेदहा लाख कोटी रुपये आहे.
मात्र १५ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणारे कर्मचारी/कामगार पीएफच्या सुविधेपासून वंचित राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *