Mon. Sep 28th, 2020

आता अनधिकृत बांधकामांवर ‘इस्त्रो’ ची नजर

राज्यातील अनधिकृत बांधकामांचे वाढते प्रमाण  रोखण्यासाठी  एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आहे.  सॅटेलाईट मॅपिंग (उपग्रह छायाचित्रण )  या  तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मंबई महापालिकेला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो कडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.  शहरातील गृहनिर्माण संस्थेस अनधिकृत ठरवल्यामुळे  याचिका दाखल करण्यात आली होती.या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली होती.

अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सॅटेलाईट मॅपिंग

इस्त्रोच्या अखत्यारीतील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर ही नोडल एजन्सी कंपनी अनधिकृत बांधकामाचे सॅटेलाईट मॅपिंग करणार आहे.

राज्यातील अनधिकृत बांधकामाचे सॅटेलाईट मॅपिंग करून सर्व छायाचित्रे सर्व पालिकांना पाठवण्यात येतील.

या तंत्रज्ञानाद्वारे ३६०० चौ. मी. क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाचे सॅटेलाईट मॅपिंग करता येणार नाही.

एखाद्या परिसरातील आडवे (हारिझाँटल) अनधिकृत बांधकामाचे सॅटेलाईट मॅपिंग करता येणार आहे.

सॅटेलाईट मॅपिंगद्वारे काढलेली छायाचित्र दिल्यानंतर संबधित बांधकामे अधिकृत किंवा अनधिकृत याचा  निर्णय पालिकांना देईल.

या सॅटेलाईट मॅपिंगचा वापर कसा करायचा, त्याचे नियोजन कसे करायचे त्याबाबत पालिकेला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *