Fri. Feb 21st, 2020

आता पुणेकर म्हणणार, “आमच्याकडे समुद्र नाही, पण ‘हे’ आहे!”

पर्यावरणपूरक आणि सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसाठी अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ‘इलेक्ट्रिक बस’ची अखेर शहरात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. पुढील सात दिवस भरलेली पोती टाकून शहराच्या सर्व भागातून, मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी या बसची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच शहरात 150 इलेक्ट्रिक बस पुण्याच्या बीआरटी मार्गावर धावणार आहेत.

पुणे शहराचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि पीएमपीच्या ताफ्यात सक्षम व चांगल्या बस आणण्यासाठी इलेक्ट्रिक बसेचा पर्याय समोर आला. अनेक महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेचे पाऊल म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 500 वातानुकूलित ई-बस घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 150 आणि दुसऱ्या टप्प्यात 350 बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 150 बस त्यांपैकी 25 मिडी आणि 125 रेग्युलर बस घेणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली. त्यामध्ये नऊ मीटर लांबीच्या बससाठी बीवायडी (इलेक्ट्रो) कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे, तर 12 मीटर लांबीच्या बससाठी टाटा कंपनी आणि ‘बीवायडी’ कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे.

पुणे शहरात सध्या यातील एक दाखल झाली आहे. सध्या तिची हडपसर ते निगडी या मार्गावर चाचणी सुरु आहे. ही बस सर्वात वेगळी आहे बसमध्ये जीपीएस, मोबाईल चार्जिंग सुविधा सीसीटीव्ही आपत्कालीन व्यवस्था डिजिटल मीटर बॉक्स असलेली ही बस पुणेकरांसाठी सेवेत दाखल होत आहे.

पुण्यातील रोज बंद पडत असलेल्या बसेस, वाढत जाणारे प्रदूषण हे सर्व कमी करण्यासाठी पीएमपीमलचा हा प्रयत्न आहे. सध्या जानेवारी महिन्यात 150 बसेस या मार्गावर धावतील तर येत्या पुढील काळात या बसेसची संख्या वाढवून जुन्या बसेस कमी करण्याचा प्रयत्न असेल त्यामुळे प्रदूषण देखील कमी होईल आणि इधन बचत होईल. राज्यात हा प्रयोग बहुदा पुण्यातच सुरु होत आहे.

सध्या देशात आणि जगात सर्वच ठिकाणी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सार्वजनिक वाहतुकी मध्ये इलेक्ट्रिक बसेस ची चर्चा सुरु आहे त्यामुळे पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी या इलेक्ट्रिक बसेस उपयोगी ठरतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *