Fri. Apr 23rd, 2021

आसाम मध्ये राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) ची शेवटची यादी जाहिर

आसाम मध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) ची शेवटची लिस्ट जाहिर झाली आहे.आसाम मध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) ची शेवटची लिस्ट जाहिर झाली आहे.

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) ची शेवटची लिस्ट जाहिर झाली आहे.  यात 3 कोटी 11 लाख 21 हजार 4 लोकांना भारतीय नागरिकत्व मिळालंय. मात्र 19 लाख 6 हजार 657 लोकांची नावं या यादीमध्ये नाहीत.

या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन  लढण्यासाठीआधीच येथे कलम 144 लागू केलं.

NRCची अंतिम यादी जाहिर होण्याआधी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली.

ही यादी गृहमंत्रालयाने जाहिर केली आहे.

31 ऑगस्ट 2015 पर्यंत 3 कोटी 30 लाख लोकांनी या यादीसाठी अर्ज दिला होता.

आता 19 लाख 6 हजार 657 लोकांची नावं या यादीमध्ये नसल्यामुळे त्यांच्यापुढे नागरिकत्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. मात्र

या लोकांना पुढील 120 दिवसांत फॉरेनर्स ट्रिब्यूनल (FT) मध्ये अर्ज करु शकतात.

FT ने  कागदपत्रांची तपासणी करुनही त्यांना या यादीत घेतलं नसेल,  तर ते लोक हायकार्ट आणि सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात.

ही यादी जाहीर होण्याआधी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जनतेला घाबरून न जाण्याचा सल्ला दिला होता. ज्यांची नावं यादीत  नाही त्यांना विदेशी मानण्यात येणार नाही. याचा निकाल  सरकारी प्रक्रियेनंतर घेण्यात येणार आहे.

तसंच हायकार्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये अर्जासाठी सरकार मदत करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *