Corona : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४५ वर

कोरोना थांबण्याचं नाव घेत नाहीये. जगात, देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्त ( Corona Patient In Maharashatra ) रुग्णांचा आकडा दिवेसंदिवस वाढत आहे. राज्यातही दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४५ इतकी झाली आहे. तर हीच आकडेवारी बुधवारच्या सुरुवातीला ४२ इतकी होती.
आर्थिक राजधानी मुंबई, पिंपरी-चिंचवड, आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक-एक असे एकूण ३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. पिंपरी-चिंचवडयेथे १ कोरोनाग्रस्त सापल्याने खळबळ उडाली.
आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील १ जणाचा समावेश आहे.
देशात आणि राज्यात दररोज वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णामुळे चिंता वाढत आहे.
कोरोनाग्रस्तांची राज्यातील शहरनिहाय आकडेवारी
पिंपरी चिंचवड – ११
पुणे मनपा – ८
मुंबई मनपा – ८
नागपूर – ४
ठाणे, नवी मुंबई , कल्याण, रायगड, रत्नागिरी, औरंगाबाद, अहमदनगर, यवतमाळ या ठिकाणी प्रत्येकी १ कोरोनाचा रुग्ण आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची जिल्हा तसेच महापालिकानिहाय आकडेवारी दिली आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.
महानगरी मुंबई गुरुवारपासून राहणार अंशत: लॉकडाऊन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे.
मुंबईत कोरोनाचा संभावित पादुर्भाव टाळण्यासाठी बेस्ट बसमध्ये ५० टक्के प्रवाशी संख्या कमी घेण्यात येणार आहे. म्हणजेच क्षमतेपेक्षा अर्धेच प्रवाशी घेतले जाणार आहेत.
तसेच बसमध्ये स्टँडिग प्रवाशी घेण्यात येणार नाही. यासंदर्भातील माहिती उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.
बसने उभ्याने प्रवास करु नये, असं आवाहन करणार ट्विट बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.