Sat. Jun 6th, 2020

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या १०७, देशात ५०० च्या वर

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीपाठोपाठ संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ५०० च्या वर आहे. राज्यात आणखी ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 107 च्या वर पोहोचला आहे. सोमवारी हा आकडा 97वर होता.

पुण्यातील ३ आणि साताऱ्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. २३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यामुळे  महाराष्ट्रात हा कोरोनाचा चौथा बळी होता. ही व्यक्ती UAE हून आली होती. त्यांना खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता. तसंच ब्लड प्रेशर आणि अनियंत्रित मधुमेहाचा विकारही होता. असं मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.  

पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सरकारने संचारबंदी लागू केली आहे. जीवनाश्यक वस्तू आणि अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या सेवा मात्र सुरू राहतील. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *