Tue. Sep 28th, 2021

धक्कादायक! पोषण आहारातील मसूर डाळीत आढळलं वटवाघुळीचं मृत पिल्लू

पोषण आहाराच्या मसूर डाळीत मृत वटवाघुळीचं पिल्लू आढळल्यानं खळबळ माजली आहे. तर नागपुरमध्येही आहारातील भातात १०० हून अधिक अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोषण आहारामार्फत लहान मुलांशी जीवघेणे खेळ सुरु आहेत. तशा अनेक घटना समोर आल्या आहेत. पोषण आहाराच्या मसूर डाळीत मृत वटवाघुळीचं पिल्लू आढळल्यानं खळबळ माजली आहे. तर नागपुरमध्येही आहारातील भातात १०० हून अधिक अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळं पोषण आहार विद्यार्थ्यांचं खरच पोषण करणारा आहे की त्यांच्या आरोग्याशी खेळ करणार हाच खरा सवाल आहे.

पोषण आहार विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा

मसूर डाळीत मृत वटवाघुळीचं पिल्लू

पोषण आहाराच्या मसूर डाळीत मृत वटवाघुळीचं पिल्लू आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

सीलबंद पाकिटात वटवाघुळीचं मृत पिल्लू आढळलं ही घटना गोंदिया जिल्ह्यातील बिजेपार येथे घडली आहे.

मायरा वाघमारे या मुलीला मसुर डाळीचं पाकिट देण्यात आलं होतं. घरी जाऊन त्यांनी पाकिट खोलून पाहिल्यानंतर त्यांना त्यात मृत वटवाघुळीचं पिल्लू आढळलं.

पोषण आहार विद्यार्थ्यांचं खरच पोषण करणारा आहे की त्यांच्या आरोग्याशी खेळ करणार हाच खरा सवाल आहे.

नागपूरमध्ये पोषण आहारातील भातात अळ्या

नागपूरच्या प्रताप नगर शाळेतील शालेय पोषण आहारातील भातात १०० हुन अधिक अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला.

महत्वाचं म्हणजे ही शाळा मुखमंत्र्याच्या विधानसभाक्षेत्रा अंतर्गत येते.

मधल्या सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आहार वाटप करायला सुरवात केली मात्र भात कच्चा आढळला.

भाताची अधिक पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या असल्याचे त्यांना आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *