Fri. Apr 23rd, 2021

‘वर्षा’च्या भिंतीवरील ‘त्या’ मजकुराचा अर्थ काय?

महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सध्या सोशल मीडियावरून (Social Media) आपली नाराजी आणि उद्विग्नता सातत्याने मांडत आहेत. त्यात आता ‘वर्षा’ बंगल्याच्या भिंतीचीही भर पडली आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर फडणवीस कुटुंबाला ‘वर्षा’ बंगलाही सोडावा लागला.

‘वर्षा’ निवास्थान सोडताना केलेल्या दिरंगाईनंतर आता जेव्हा हा बंगला नवीन मुख्यमंत्र्यांना रहाण्यासाठी सूपूर्द करण्यात येत होता, त्यावेळी ‘वर्षा’ बंगल्याच्या भिंतीवर फडणवीस यांची लहान मुलगी ज्या खोलीत रहात होती त्या खोलीच्या भिंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहला असल्याची माहिती समोर येतेय.

‘Who is UT?’

‘UT is mean’

‘Shut up’

अशी वाक्यं ‘वर्षा’ बंगल्याच्या भिंतीवर लिहिली असल्याची आढळून आली.

मात्र यासंदर्भात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना आपण 1 महिन्यापूर्वीच बंगला रिकामा केला असल्याचं म्हटलं आहे. तसंच बंगला सोडताना त्याचा कोपरा न् कोपरा तपासला होता, त्यावेळी तेथे असा कोणताही मजकूर लिहिलेला नव्हता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *