Sun. Nov 29th, 2020

जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा पोलिसांकडून हस्तगत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बंद करून 3 वर्षाहून अधिक काळ उलटून गेला. मात्र तरीदेखील आज ही चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बाळगण्याचा घटना अनेक समोर येत आहेत.

दरम्यान नुकतीच शांतीनगर पोलिसांनी गस्ती दरम्यान जुन्या नोटा असलेली एक कोटी रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 09 .30 वाजताच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब मुल्ला व त्यांचे पथक साईबाबा जकात नाका येथे गस्त घालत होते. तेव्हा स्वयंसिद्धी महाविद्यालयासमोर दोन संशयित इसम काळ्या रंगाची बॅग घेऊन येत असताना दिसले.

सदर इसमांच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये भारतीय चलनातून रद्द करण्यात आलेल्या 1000/- रुपये दराच्या 8000 नोटा व 500 /- रुपये दराच्या 4000 नोटा अशा एकूण एक कोटी रुपयांच्या नोटा मिळाल्या.

नोटा बाळगल्या प्रकरणी आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अदखलपात्र गुन्ह्याचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *