पुणे-बंगळुरू महामार्गावर कोट्यवधींची हेराफेरी
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
गत वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यव्हारातुन जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातुन बाद करण्याची घोषणा केली.
त्यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी मार्च पर्यंत मुदत देण्यात आली. परंतु त्यानंतरही जुन्या नोटा बदलून देण्याचं रॅकेट सुरूच आहे.
याविरोधात कोल्हापूर मधिल शिरोली पोलिसांनी कारवाई करत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दोघांना अटक केली.
कमलेश नंदलाला दुंबानी आणि किशोर गांधी असं या इसमांची नावं असून ते कोट्यवधी रुपयांची फेरफार करत होते.
पोलिसांना खबर मिळताच त्यांनी सापळा रचून दोघांना अटक केली.