Mon. Jan 24th, 2022

जगावर ‘ओमिक्रॉन’चे संकट

देशातील कोरोना परिस्थितीत काही प्रमाणात शिथिलता येत आहे. मात्र अशातच दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची खबरदारी घेण्यात यावी, असेही केंद्राने राज्यसरकारला सुचवले आहे.

कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे संपूर्ण देशात काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे. तसेच याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर होणार तसेच राज्यातही नव्या निर्बंधाची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर देशात उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’च्या प्रसाराल रोखण्यासाठी महाविकासआघाडी सज्ज असल्याचा दावा मविआकडून करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारनेही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय निवडक विमान प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच आता भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

‘ओमिक्रॉन’ कोरोनाचा नवा व्हेरिएंट

दक्षिण आफ्रिकामध्ये कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. बी.१.१.५२९ विषाणूचे जागितक आरोग्य संघटनेकडून ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव ७ पट वेगाने होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. डेल्टा व्हेरिएंट १०० दिवसांत जितका पसरला त्याच तुलनेने ओमिक्रॉन हा विषाणू १५ दिवसांत पसरतो. दक्षिण आफ्रिकेमधील कोरोना रुग्णांमध्ये या ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. तसेच लसीचे दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे उघड झाल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *