गांधीजीच्या जयंतीनिमित्त सलमान खानचा तरुणांना ‘हा’ संदेश
गांधी जयंतीनिमित्त भाजपाचे सचिव आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर सलमान खानने ट्विट करून भारतीय तरुणांना संदेश दिला आहे.

2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची 150वी जयंती असून सलमान खानने तरुणांना व्हिडीओच्या माध्यमातून फिटनेस आणि स्वच्छता राखण्याचा संदेश दिला आहे. स्वातंत्र लढ्यात गांधींजींनी अहिंसात्मक मार्गाने लढा स्वातंत्र मिळवण्यात यशस्वी ठरले. गांधी जयंतीनिमित्त भाजपाचे सचिव आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर सलमान खानने ट्विट करून भारतीय तरुणांना संदेश दिला आहे.
नेमकं काय म्हणाला सलमान खान ?
सलमान खानने तरुणांना फिटनेस आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
या व्हिडीओमध्ये सलमानने असे म्हटले आहे की, ‘आज 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे.
संपूर्ण देशात गांधी जयंती साजरी केली जाते.
कारण गांधीजी हे भारताचे राष्ट्रपिता होते आणि त्याच निमित्ताने सर्व तरणांनी आपल्या फिटनेस आणि स्वतच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.
स्वच्छ भारत, स्वच्छ भारतीय आणि फिट इंडिया’ असा संदेश सलमान खानने दिला आहे.
“गांधी जयंतीनिमित्त भाईने तुम्हाला संदेश द्यायला सांगितला आणि तो द्यायला चुलबुल पांडे तयार झाला आहे”, असे कॅप्शन दिले आहे.
#GandhiJayanti k is mauke pe, Bhai ne bola aapko message dene ko…
aur Chulbul Pandey is ready! @PMOIndia @KirenRijiju pic.twitter.com/qmL1WpflK2— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 1, 2019