Mon. Jan 24th, 2022

पुन्हा एकदा श्रेयस तळपदे मराठी टेलिव्हिजनवर

मराठी मालिकेत म्हणजेच झी मराठीवरील आभाळमाया आणि अवंतिका तसेच दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी मधील गोलमाल सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे असा आपला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनवर दिसणार. हो हे खरं आहे. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येणार .या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि या मालिकेची झलक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांना हा प्रोमो भरपूर आवडला आहे .

तसेच मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होतो आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका खूप वेगळी आहे ही एक अनोखी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *