Mon. Dec 6th, 2021

पहिली ते सातवीपर्यंत सर्व विषयांचं एकच पुस्तक

विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणाऱ्या दप्तराचं ओझं कमी करण्याच्या हेतूने शिक्षण विभागाने नवा प्रयोग योजला आहे. पहिली ते सातवी पर्यंत सर्व विषयांचं एकच पुस्तक तयार करण्याचा हा अनोखा प्रयोग असणार आहे. त्यानुसार तीन महिन्यांत शिकवणं अपेक्षित असलेला अभ्यासक्रम एक किंवा दोन पुस्तकांत असेल.

दप्तराचं वाढतं ओझं या विषयावरून न्यायालयाने शिक्षण विभागाला सातत्याने प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संदर्भात शिक्षण विभागाकडे अहवाल मागवला.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी एकत्रित पुस्तकं तयार करण्यासंदर्भात चर्चा झाली.

अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शाळेतच अभ्यासाच्या पुस्तकांचा सेट ठेवला जातो. पण हे शासकीय शाळांत शक्य होत नाही.

त्यामुळेच प्रत्येक विषयाचं स्वतंत्र पुस्तकं रद्द करून त्याऐवजी एकच पुस्तक ठेवून त्यात सर्व विषय समाविष्ट करण्याचा विचार शासन करत आहे.

काय होईल त्याने फायदा?

सध्या प्रत्येक विषयाचं वेगळं पुस्तक असल्याने विद्यार्थ्यांना साधारणतः दररोज 3 तरी पुस्तकं घेऊन जावी लागतात.

मात्र आता त्याऐवजी 1 च पुस्तक असेल. विषयानुसार तीन महिन्यांचा अभ्यास या एकेका पुस्तकात असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *