Tue. Jan 19th, 2021

कुटुंबात 9 जणं असताना फक्त 5 मतं; उमेदवाराचे अश्रू अनावर

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाला बहुमत मिळाले असून येत्या 30 मे रोजी पंतप्रधान पदासाठी मोदी शपथविधी घेणार आहेत. संपूर्ण देशात भाजपाचा विजय झाला असून विरोधकांना मोठ्या प्रभावाला समोरे जावे लागले आहे. एका ठिकाणी मोदींना बहुमत मिळत असताना दुसरीकडे जालंधरमध्ये अपक्ष उमेदवार नीतू शटरवाला यांना फक्त 5 मतं मिळाली, असे नीतू यांनी मतमोजणी केंद्राबाहेर सांगितले. फक्त 5 मतं मिळाल्यामुळे शटरनवाला यांना रडू कोसळले.

नेमकं काय घडलं ?

लोकसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 23 मे रोजी पार पडली.

यावेळी सर्वाधिक मतं एनडीएला मिळाली.

मात्र जलंधरमध्ये एका अपक्ष उमेदवाराला फक्त 5 मतं मिळाल्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर रडू लागला.

माझ्या घरात एकूण 9 मतदार असतानाही मला फक्त 5 मतं मिळाली असे सांगत त्याला रडू आवरत नव्हते.

नीतू शटरनवाला असे अपक्ष उमेदवाराचे नाव आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीला नीतूला 5 मतं मिळाली होती. मात्र शेवटचा टप्पा संपेपर्यंत त्याला एकूण 856 मतं मिळाली.

5 मतं मिळाल्यामुळे नीतू मतमोजणी केंद्राबाहेर आल्यावर ढसाढसा रडला.

रडत असल्यामुळे आजू-बाजू लोकांनी त्याचा व्हिडीओ काढला.

या व्हिडीओला लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *