आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण

पिंपरी : कांद्याने गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दरामुळे डोळ्यात पाणी आणले आहे. अशातच चाकण मार्केटमध्ये आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. या कांद्याला प्रति क्विंटल 9 हजार 500 इतका दर मिळाला. मात्र किरकोळ बाजारात कांद्याचे दर जैसै थेच आहेत.
बाजारात 1250 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला कमाल 9500 इतका भाव प्रति क्विंटलला मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी आहे. तसेच बाजारात नवा कांदा येण्यापर्यंत दर असेच चढे राहतील, असे बाजार समितीच्या आडत्यांनी सांगितले आहे.
दरवेळी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात कांदा येण्यास सुरुवात होते. परंतु यंदा डिसेंबरमध्ये येणारा कांदा जानेवारीच्या मध्यानंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे
तूर्तास तरी आवकमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.