Wed. Apr 21st, 2021

कोरोनाच्या फटक्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

कोरोनाचा देशातील अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. तसेच कोरोनाचा देशातील अनेक गोष्टींना बसलेला पहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांबरोबरच मोठमोठे व्यावसायिकही हैराण झाले आहेत.

कोरोनाचा शेतकऱ्यांना देखील फटका बसत आहे. आज कोरोनामुळे कांदा आवक वाढल्याने दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

कोरोनामुळे येणाऱ्या काळात बाजार समिती देखील बंद होतील. या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचा माल जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये आणला. त्यामुळे आज कांद्याचा दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

500 ते 600 रुपयाने आज कांद्याचे दर घसरले आहेत. कोरोनामुळे अनेक व्यवहार बंद होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बाजार समितीत देखील व्यवहार बंद होतील या भीतीने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचा आवक बाजार समितीमध्ये आणत आहे.

परिणामी कांद्याचे आवक वाढल्याने दर देखील आज मोठ्या प्रमाणात घसरले. आज सरासरी कांद्याला 1100 ते 1200 रुपये भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *