Mon. Oct 25th, 2021

शिवसेना आमदाराचे वारिस पठाणला खुलं आव्हान

राजकारणातील वाचाळवीर नेत्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात अशांतीचे वातावरण निर्माण होतं. दरम्यान नुकतंच एमआयएमचे नेते आमदार वारिस पठाण यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होत.

त्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेक नेते मंडळी पठाणांच्या वक्तव्यांवर त्यांची कानउघडणी करण्याचे काम करत आहेत.

नुकतीच शिवसेना आमदारांनी पठाणांवर निशाणा साधत त्यांच्यावर टीकेचे ताशेरे ओढले आहेत. एका कार्यक्रमामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वारिस पठाणांना खुलं आव्हान केलं आहे.

नक्की काय म्हणाले संजय गायकवाड ?

संजय गायकवाड यांची वारीस पठाण यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली असल्याचे चित्र पहायला मिळाले. गायकवाड यांनी पठाण यांना लांडे म्हणत त्यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे.

जशी तुझी जीभ चालते तशा आमच्या ही तलवारी चालतील असं विधान करतानाचा आमदारांचा वादग्रस्त व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

तुम्ही तुमच्या बायकांना गुलाम बनवून घरात ठेवलं आहे. तुझी लाखाची फौज असेल तर शिवरायांचे 500 मावळे तुझ्या फौजेला चीत करतील. असे गायकवाड यांना आक्रमक पवित्रा घेत पठाण यांना सुनावले आहे.  

तसेच मी सोमवारी येतोय विधानसभेत भेटतो तुला असं खुलं आव्हान देत वारीस पठाणला उभा फाडीन अशी धमकीही गायकवाड यांनी दिली आहे.

अशा प्रकारचे वादग्रस्त विधान गायकवाड यांनी बुलढाण्यातील मलकापूर येथे शिवजयंतीच्या एका कार्यक्रमात केलं आहे. आता त्यांच्या या विधानाचे राज्यात काय पडसाद उमटणार हे पाहणे लक्षणीय ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *