Thu. May 19th, 2022

सरकारच्या अपयशाचा ढोल राज्यभर वाजवणार- बाळासाहेब थोरात

“राज्यातील पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय. राज्य सरकारच्या या अपयशाचा ढोल राज्यभर वाजवणार” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगलीत म्हटलंय.

आज बाळासाहेब थोरात यांनी सांगलीत पुरामध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पूर परिस्थिती हाताळण्यास हे सरकार अपयशी ठरले असल्याचं म्हटलंय.

 

 

या सरकारचे मंत्री हे गंभीर नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपण अपयशी ठरलो हे सांगावं असं आवाहनही थोरात यांनी केलं. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे आमदार लोकप्रतिनिधी आपला एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देणार आहेत, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यानी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपण अपयशी ठरलं हे सांगावे असं जाहीर आव्हानही दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.