Sun. Nov 28th, 2021

मी घुसखोर नाही, घुसखोरांचा बाप आहे- ओवैसी

#CAA आणि #NRC च्या मुद्द्यावरून देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. लोकसभेतही या मुद्द्यावरून वातावरण तापलं. MIM चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायद्यावर जोरदार टीका केली. यावेळी आपण घुसखोर नव्हे, तर घुसखोरांचे बाप आहोत, असं वक्तव्य केलं.

काय म्हणाले ओवैसी?

NRC मध्ये आसाममधील 5 लाख मुस्लिमांची नावं नाहीत मात्र आसाममधल्या बंगाली हिंदूंना सरकार नागरिकत्व देणार आहे.

त्यासाठीच #CAA आणि #NRC चा घाट घातला आहे, असा आरोप ओवैसींनी केला.

CAA आणि NRC एकच आहेत. हे केवळ नागरिकत्व देत नाहीत, तर घेतात पण. तसंच मी घुसखोर नाही, तर घुसखोरांचा बाप आहे, असं ओवैसी म्हणाले.

भाजपावर ओवैसींची टीका

दिल्लीला जामिया मिलिया इस्लामिया येथे झालेल्या गोळीबाराबद्दल ओवैसी यांनी पंतप्रधानांना जबाबदार धरत टीका केली.

शांतीपूर्णरीत्या सुरू असलेल्या आंदोलनावर एक दहशतवादी येऊन पोलिसांच्या समक्ष विद्यार्थ्यांवर गोळीबार करतो, याला भाजपने देशात पसरवलेला द्वेष कारणीभूत असल्याची टीका ओवैसींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *