Thu. Dec 2nd, 2021

पाकिस्तानात रेल्वे दुर्घटनेत ३० प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तान: पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची धडक होऊन भीषण अपघात घडला आहे.सर सय्यद एक्सप्रेस आणि मिल्लत एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली असून यामध्ये ३० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भयंकर होता की, एका एक्स्प्रेस गाडीच्या धडकेमुळे दुसरी एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली, अशी माहिती घोटकी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उस्मान अब्दुल्ला यांनी दिली. दक्षिण पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात ही सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे.

लाहोरच्या दिशेने जाणारी सर सय्यद एक्स्प्रेस गाडी कराचीहून सरगोधाकडे जाण्यासाठी निघाली असताना मिल्लत एक्स्प्रेसला धकड बसून हा अपघात झाला.
येथील रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १४ बोगी रुळावरून घसरल्या आहेत. यामधील अनेक प्रवासी अद्याप अडकले असून बचावकार्य सुरु आहे.

४ मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाले असून, १४ मृतदेह खराब झाले आहेत. असंख्य प्रवाशी रेल्वेच्या बोगीमध्ये अडकलेले आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बोगी कापाव्या लागणार असून, अवजड मशीन्सची गरज असल्याचंही पोलीस अधिकारी उस्मान अब्दल्ला म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *