Sat. Aug 13th, 2022

पाकिस्तानी नागरिकांना आता १ वर्षाचाच अमेरिकन व्हीसा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अमेरिकेबरोबरच्या व्यापारात भारताला मिळणारे विशेष प्राधान्य समाप्त करायचे असल्यामुळे भारताला याचा मोठा दणका बसणार आहे. तसेच आज म्हणजेच बुधवारी अमेरिकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानी नागरिकांना आता अमेरिकेत येण्यासाठी देण्यात आलेल्या व्हीसाची मुदतीत घट करण्यात आली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानी नागरिकांना यापूर्वी ५ वर्षांचा व्हीसा मिळत होता. मात्र आता व्हीसाचा अवधी कमी करण्यात आला आहे. आता पाकिस्तानी नागरिकांना १ वर्षांचा व्हीसा मिळणार आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अमेरिकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे.

अमेरिकेत येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना व्हीसाची मुदतीत घट करण्यात आल्याचे समजते आहे.

पाकिस्तान नागरिकांना अमेरिकेकडून ५ वर्षांचा व्हीसा मिळत होता.

मात्र आता पाकिस्तानी नागरिकांना १ वर्षाचा व्हीसा मिळणार आहे.

पाकिस्तानमधील अमेरिकेच्या राजदूतांनी पाकिस्तानच्या सरकारला याबाबत माहिती दिली आहे.

तसेच व्हीसाच्या नव्या नियमांमध्ये पाकिस्तानच्या पत्रकार आणि माध्यमातील लोकांना फक्त तीन महिन्यांचा व्हीसा उपलब्ध होणार आहे.

व्हीसाची मुदत कमी केली असून व्हीसासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे.

पाकिस्तानी नागरिक आता १ वर्षापेक्षा जास्तकाळ अमेरिकेत राहता येणार नसून त्याला जास्तकाळ राहयचे असेल तर त्याला पाकिस्तानमध्ये परत येऊन पुन्हा व्हीसा नुतनीकरण करत पुन्हा अमेरिकेत जावे लागणार आहे.

तसेच वर्क व्हीसा, जर्नलिस्ट व्हीसा, धार्मिक व्हीसासाठी शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

यामुळे पाकिस्तानला याचा मोठा फटका बसणार असल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.