पाकिस्तानात पोलिसाने केले हिंदू मुलीचं अपहरण

पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात एक पोलिसाने अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करुन तिच्याशी जबरदस्ती निकाह केला. त्यानंतर हिंदू मुलीला जबरदस्ती इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडला. या पोलिसाचे नाव गुलाम मारुफ कादरी असून याने सिंधच्या नौशाहरो फिरोझ जिल्ह्यातून अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण केले आणि या पोलिसाला परिसरातील अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. मात्र या पोलिसांनी एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करुन तिच्याशी निकाह केला.
“पाच दिवसांपूर्वी मुलगी बेपत्ता झाली. ती शाळेतून घरीच परत आलीच नाही. कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर तिचे अपहरण झाल्याचं समजलं आहे. ”टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिंधमधील एका हिंदू नेत्यानं गुलाम मारुफ कादरीने ११ फेब्रुवारीला स्थानिक दर्ग्यामध्ये मुलीला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडला. तिला मरीया हे नाव दिले.
त्यानंतर घरापासून ४०० किमी अंतरावर कराचीमध्ये त्याने निकाह केला. अशी माहिती अखिल पाकिस्तान हिंदू पंचायतीने दिली आहे. शिवाय कादरीने मंगळवारी निकाह झाल्याचं सार्वजनिक केल असून सोशल मीडियावर अपलोड केलेल्या लग्नाच्या सर्टिफिकेटमध्ये कादरीने या मुलीची जन्मतारीख नमूद केली आहे. तसेच मुलीचे वय १९ दाखवले आहे मात्र मुलीच्या कुटुंबाने ती अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. “या घटनेनंतर आमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही” असं सिंध प्रांतातील हिंदू नेत्यानं म्हटलं आहे.